*
विनयशील ,शिक्षण क्षेत्रातील तेजोमय सूर्य, छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांची 154 वि पुण्यतिथी*
कोल्हापूर
येथील राजाराम कॉलेज या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व त्यांच्या स्मृतींच्या उजाळा देत अल्पावधीत त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राजाराम कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनिता बोडके अध्यक्ष माननीय डॉक्टर यशवंतराव थोरात माजी अध्यक्ष नाबार्ड तसेच माननीय डॉ. इस्माईल पठाण इतिहास अभ्यासक प्रमुख व्याख्याते माननीय डॉ.भारत महारुगडे , डॉ.उषा थोरात ,डॉ. रघुनाथ कडाकणे तसेच बी एन पाटणकर ट्रस्टचे चेअरमन माननीय आर. ए.उर्फ (बाळ )पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर व नकुल पाटणकर उपस्थित होते.
. प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराज यांचे शिक्षण क्षेत्रातील अलौकिक कार्य आजच्या विद्यार्थ्यांना समजावे व त्यांची प्रतिमा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा आजच्या समारंभाचा मुख्य उद्देश डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी स्पष्ट केला.
. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री भारत महारुगडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून दिला. कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये व विकासामध्ये महाराजांचा मोलाचा वाटा आहे राजा असूनही बडे जाऊ न करणारा शिक्षणाविषयी तळमळ असणारा कोल्हापूरला जगाशी जोडणारा पर्यटनासाठी नाही तर कोल्हापूरच्या विकासासाठी व शिक्षण क्षेत्रासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी इंग्लंडला जाणारा राजा ,सर्वच क्षेत्रात शिक्षण, शेती, क्रीडा, स्थापत्यशास्त्र इत्यादी सर्वच क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असणारा राजा म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे)
. कार्यक्रमाचे अध्यक्ष व नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विचार मांडताना म्हणाले की,
अल्पावधीत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी इटलीतील फ्लोरेन्स या ठिकाणी आलेल्या या राजाचे महत्व इटलीतील लोकांनी ओळखले म्हणूनच आज दीडशे वर्ष झाली तरी फ्लॉरेन्स येथे त्यांच्या स्मृती जिवंत ठेवल्या आहेत आणि आपण विद्यार्थी मित्रहो काय करतोय. त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपणास राजाराम महाविद्यालय आणि फ्लोरेन्स विद्यापीठ यांच्यात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी समझोता करार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रगत होण्याची संधी उपलब्ध होईल. असा मोलाचा संदेश दिला.
. या कार्यक्रमास माननीय श्री ऋतुराज इंगळे, माननीय सचिन मेनन, माननीय सौ. नंदिता घाडगे उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका सौ. ढवणे मॅडम यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश दळवी यांनी केले .