जनसुराज्य पक्षाकडून १५ जागांची मागणी विनय कोरे यांची माहिती, संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर

Spread the news

 

 

 

 

 

 

 

जनसुराज्य पक्षाकडून १५ जागांची मागणी

 

  1. विनय कोरे यांची माहिती, संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर

 

 

कोल्हापूर

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही १५ जागांची मागणी केली आहे, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार व सांगली जिल्ह्यातील दोन जागांचा समावेश असल्याची माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी दिली. दरम्यान, कोरे यांनी करवीर मतदार संघातून संताजी घोरपडे यांची उमेदवारीच जाहीर केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.कोल्हापूर च्या चार जागा सोबतच सांगली सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढावण्याची तयारी आम्ही केली आहेत*

आमदार कोरे यांनी सांगितले की, आम्ही जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपचा घटक पक्ष आहोत.

महाविकस आघाडी वेळी आम्हाला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र, भाजप ची साथ सोडली नाही. या काळात आम्हाला कधीच भाजप कडून वेगळी वागणूक मिळाली नाही. इतर छोट्या घटक पक्षाचं मला माहित नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकही जागा मागितली नाही. हातकणंगले मतदार संघातील उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही सिंहाचा वाटा उचलला आहे.

ते म्हणाले, जनसुराज्य शक्ती पक्ष २००४ पेक्षा वेगाने मोठा झालेला या निवडणुकीत दिसेल. करवीर, शाहूवाडी, हातकणंगले व चंदगड या चार जागा आम्हाला मिळाव्यात ही आमची मागणी आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज व जत मतदार संघावर आम्ही दावा केला आहे. राज्यातील किमान १५ जागा आम्हाला मिळायला हव्यात. त्यासाठी आमची चर्चा सुरू आहे.

करवीर विधानसभा मतदार संघातून कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार त्या पक्षाला ती जागा हा महायुतीचा नियम आहे. करवीर मतदार संघात सध्या महायुतीचा आमदार नाही. या मतदार संघात आमची ताकद आहे. यामुळेच येथील उमेदवार जाहीर केला आहे. आपल्या शाहूवाडी मतदार संघात बराक ओबामा जरी येऊन उभारले, तरीही आपणच निवडून येणार असा टोलाही त्यांनी मारला.

जनसुराज्य पक्षाने केलेली जागांची मागणी आणि जाहीर केलेला उमेदवार यामुळे महायुतीत वाद होण्याची चिन्हे आहेत. कारण करवीर, हातकणंगले, मिरज, जत, चंदगड या सर्वच जागा महायुतीत शिवसेना व भाजपला हव्या आहेत. यामुळे जागा वाटपात या पक्षात वादाचा खडा पडण्याची शक्यता वाढली आहे.

 

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!