राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

Spread the news

 

राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

कोल्हापूरदि.20

 राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहेया केंद्रांचा तसेच विविध उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला.

 कौशल्य विकास कौशल्यरोजगारउद्योजकता  नाविन्यता विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात आलास्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिकजिल्हाधिकारी अमोल येडगेजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार मानेजिल्हा कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी,  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडेया संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक विरेन भिर्डीप्राचार्य डॉसुहास सपाटेजिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारत हा सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारा देश आहे.  विकसित भारताचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असून देशाला जगात अव्वल बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. युवकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणताना त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून युवकांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्व कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ तरुण-तरुणींनी रोजगाराभिमुख व्हावे, असे आवाहन त्यांनी  यावेळी केले.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये देण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

 

कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या उद्देशाने राज्यातील  नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील 1 हजार निवडक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

कौस्तुभ गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आभार प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!