गोकुळ च्या वतीने गुढीपाडव्याला विविध कार्यक्रम
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ च्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध बक्षीस वितरण, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनरीचे उद्घाटन तसेच गोकुळ पेट्रोल पंपाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात होणार आहे.
सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनरीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे भूषवणार आहेत. गोकुळ पेट्रोल पंपाचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते तर खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए, वाय. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व सर्व संचालकांनी केले आहे